November 5, 2026 12:18 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

भोर-राजगड (वेल्हा) तालुका कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा १९ जून रोजी

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर : भोर-राजगड (वेल्हा) तालुका कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या वतीने व्यापारी, वितरक व पदाधिकाऱ्यांचा भव्य स्नेहमेळावा शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोनाली गार्डन, भोर येथे संपन्न होणार आहे.
या स्नेहमेळाव्यास महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, सचिव प्रफुल जैन, उपाध्यक्ष मधुकरजी गायकवाड, पुणे, सातारा व अहमदनगर झोनचे अध्यक्ष अजित शेट लुनावत तसेच पुणे जिल्हा डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष गवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा रूरल कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. व्यापारी बांधवांमध्ये परस्पर संवाद, उद्योग क्षेत्रातील घडामोडींची माहिती व संघटनात्मक बळकटीसाठी हा स्नेहमेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन भोर-राजगड (वेल्हा) तालुका कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष विशाल सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट