प्रतिनिधी: शिवशाही लाईव्ह
उरुळी देवाची परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून घेण्यास फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या वतीने आज पासून सुरुवात करण्यात आली असून नगरपरिषदेचे सभागृह नेते श्री.प्रशांत भाडळे पाटील व मा.सरपंच श्री.तात्यासाहेब भाडळे पाटील यांनी प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहून कामाची पाहणी केली,

तसेच येत्या काही दिवसांत आदर्शनगर, मंतरवाडी, गावठाण, माळआळी, खंडोबामाळ, शेवाळेवाडी, सावली होम तसेच पालखी मार्ग व इतर सगळ्याच रस्त्यावर खड्डे बुजवून घेण्यात येणार आहेत या कामासंदर्भात नगराध्यक्ष श्री.संतोषभाऊ सरोदे, उपनगराध्यक्ष श्री.ओंकारशेठ कामठे, सभागृह नेते श्री.प्रशांत भाडळे पाटील तसेच मुख्याधिकारी श्री.प्रसाद शिंगटे साहेब यांचे मनःपूर्वक आभार



