November 5, 2026 2:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

पुणे-सातारा महामार्गावरील धांगवाडी पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

पुणे-सातारा महामार्गावरील धांगवाडी पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. वाहनातून आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळल्याने महामार्गावरील वाहनचालकांमध्ये घबराट पसरली.

भोर तालुक्यातील धांगवाडी पुलावरून पुण्याच्या दिशेने जाणारी कार अचानक पेट घेतल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे वाहनातील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेमुळे पुणे-सातारा महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट